माझ्या डॉक्टर मित्राच्या मृत्यूला करोनापेक्षाही आपली निकृष्ट आरोग्य व्यवस्था जास्त जबाबदार आहे!
सुनील फक्त सार्वजनिक आरोग्य यंत्रणेमधील एक घटक नव्हता, तर आपल्या आजुबाजूला असलेल्या व्यवस्थेचे प्रतिबिंब होता. त्याच्या कामाचे आणि त्याने केलेल्या संघर्षाचे सामाजिक, आर्थिक व राजकीय ऑडिट झाले पाहिजे. त्याच्या मृत्यूबाबत मला प्रश्नचिन्ह उभे करायचे नाही, पण कोविड केअर सेंटर कसे चालते, याच्यावर नागरिकांचे लक्ष असले पाहिजे.......